![]() |
महाराष्ट्र पल्स न्यूज (बातमी प्रतिनिधी)
विटनेर (जळगाव):
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने 'वक्रतुंड मित्र मंडळ, विटनेर' यांच्या वतीने मोफत भव्य होमिओपॅथी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले।
सदर शिबिरासाठी श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, चिंचोली (जळगाव) येथील तज्ज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले।
सध्या ग्रामीण भागात कपाशी आणि मका काढणीच्या शेतीकामांची लगबग सुरू असून शेतकरी व मजूर वर्ग कामात व्यस्त आहे. असे असतानाही गावातील नागरिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
![]() |
| शिबिरातील रुग्णांची तपासणी चालू असतानाची छायाचित्रे |
सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गावातील एकूण २१० महिला व पुरुषांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात नेत्रविकार तपासणी, मोतीबिंदू तपासणीसह त्वचारोग, सांधेदुखी, महिलांचे आजार, बालरोग व पोटाच्या विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर सल्ला देण्यात आला।
तपासणीअंती गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. गावातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत वक्रतुंड मंडळाचे मनापासून आभार मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर, वैद्यकीय पथक, वक्रतुंड मित्र मंडळाचे सदस्य श्री भूषण भाऊ, नवल भाऊ, गौरव, सचिन भाऊ, मंगेश , उमेश भाऊ,अमोल, राजेश, पवन,सागर csc, आकाश व इतर सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली .तसेच सर्व पदाधिकारी स्वंयसेवक व ग्रामस्थांनी देखील विशेष परिश्रम घेतले।
"आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून ग्रामीण जनतेसाठी मंडळाने हा सामाजिक उपक्रम राबविला असून भविष्यातही असे लोककल्याणकारी उपक्रम सुरू राहतील." — वक्रतुंड मित्र मंडळ, विटनेर
![]() |
| Maharashtra Pulse News |



Post a Comment
0 Comments