Type Here to Get Search Results !

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने बेलेश्वर महादेव मंदिरात वारसा संवर्धन व स्वच्छता अभियान संपन्न


 

मेहरूण, जळगाव (प्रतिनिधी):

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जाणीव रुजावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांच्या वतीने श्रावण सहलीचे औचित्य साधून बेलेश्वर महादेव मंदिर परिसरात ‘वारसा संवर्धन व स्वच्छता अभियान’ उत्साहात राबविण्यात आले.


या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात श्रमदान करत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. तसेच मंदिर परिसरातील ऐतिहासिक वास्तू, वस्तू व त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांची माहिती जाणून घेतली. आपला वारसा जपणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, याचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.


श्री.बेलेश्वर महादेव मंदिर मेहरुन


‘वारसा जपूया, इतिहास समजूया!’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि संघभावनेचे प्रत्यक्ष धडे मिळाले.


मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यालयातील शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागातून ‘आपला इतिहास–आपला वारसा–आपली जबाबदारी’ हा सामाजिक संदेश दिला.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 

 

Post a Comment

0 Comments