जळगाव:
श्रावण मासातील शेवटच्या सोमवाराचे औचित्य साधून आज, दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर परिसरात भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास भाविक व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबीरादरम्यान उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल नेत्र व शारीरिक तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप केले.
शिबीरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. रेखा राजपूत, डॉ. किशोर देशमुख तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णतपासणी करून योग्य वैद्यकीय मार्गदर्शन दिले.
या आरोग्य कार्यात महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी बिभीषण पोळे, विशंभर ढगे, दीपाली बोर्डे, फिया पटेल, धनश्री तायडे आणि अविनाश जाधव यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.
सदर सामाजिक व आरोग्यदायी शिबीर श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ.यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमासाठी ओंकारेश्वर मंदिराचे व्यवस्थापक जुगल किशोर जोशी व मंदिर विश्वस्तांचे बहुमोल सहकार्य लाभले.
धार्मिक उत्सवाचे औचित्य साधून राबवलेल्या या स्तुत्य आरोग्य उपक्रमाबद्दल मंदिर व्यवस्थापन, भाविक व स्थानिक नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
मुख्य संपादक श्री नवल परदेशी

Post a Comment
0 Comments