Type Here to Get Search Results !

वराड येथे विटनेर माध्यमिक विद्यालयाची पालक-शिक्षक-विद्यार्थी सहविचार सभा संपन्न


 

विटनेर (प्रतिनिधी): 


धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय, विटनेर (ता. जि. जळगाव) यांच्या वतीने वराड येथे पालक-शिक्षक-विद्यार्थी सहविचार सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक हिरामण सोनजी सपकाळे होते. सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष हिरामण सपकाळे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


मुख्याध्यापक पी. एस. बाविस्कर यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाची गुणवत्तेची व उज्ज्वल निकालाची परंपरा विशद केली. 


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विटनेर शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन करत पालकांनी मांडलेल्या समस्यांचे विद्यालयामार्फत योग्य निरसन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



उपशिक्षक डी. यु. सावकारे यांनी मनोगतातून शाळा व विद्यार्थ्यांमधील ऋणानुबंधावर प्रकाश टाकला. 


तसेच शाळेने मागील २० वर्षांत साधलेली प्रगती आणि वराड व सुभाषवाडी गावातील विद्यार्थ्यांचे योगदान यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात हिरामण सपकाळे यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करत आपले अनुभव ग्रामस्थांसमोर मांडले.


कार्यक्रमास सुभाषवाडी येथून विनोद राठोड, विठ्ठल चव्हाण, कांतीलाल राठोड, अनिल चव्हाण तसेच वराड येथील प्रल्हाद भादू जाधव, शांताराम दौलत कडूकर, यश राजेंद्र ठाकरे, अरुण संतोष सोनवणे, रवींद्र सपकाळे, प्रवीण जाधव, शांताराम कडूकर यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक एस. आर. देशमुख यांनी केले.



महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 


Post a Comment

0 Comments