* मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी सुपूर्द
* संकटात सापडलेल्या बळीराजासाठी मदतीचा हात ठरला 'आशेचा किरण'
शेगांव:
राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव पुन्हा एकदा धावून आले आहे. दुष्काळबाधित बळीराजाला मोठा आधार देण्यासाठी संस्थानच्या वतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' साठी १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करून धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.
केवळ आर्थिक हातभार नाही, तर 'आशेचा किरण':
श्री गजानन महाराजांच्या कृपेने ही दिलेली मदत केवळ एक आर्थिक हातभार नसून संकटात सापडलेल्या अन्नदात्यासाठी एक आशेचा नवा किरण ठरत आहे. 'सेवा हिच साधना' हे ब्रीद मानून संस्थान नेहमीच नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक संकटांच्या काळात मदतीसाठी अग्रभागी राहिले आहे.
शेतकऱ्यांसाठी महाराजांच्या चरणी प्रार्थना:
याप्रसंगी संकटात सापडलेल्या बळीराजाला ताकद मिळावी म्हणून प्रार्थना करण्यात आली:
"गजानन महाराज, आमच्या शेतकऱ्यांना बळ द्या... धरतीला पुन्हा हिरवा शालू चढू द्या... आणि या संकटातून सारायला शक्ती द्या..."
श्री गजानन महाराज संस्थानच्या या संवेदनशील व लोकोपयोगी पावलाचे संपूर्ण राज्यभरातून मोठे स्वागत आणि कौतुक होत आहे.
॥ गण गणांत बोते ॥
!! सेवा हिच साधना !!
Maharashtra Pulse News 📰
संपादक श्री नवल परदेशी

Post a Comment
0 Comments