Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’; २३ केंद्रांवर मेळावे









जळगाव: 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. ना. श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यात मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकाच दिवशी तब्बल २३ वेगवेगळ्या केंद्रांवर हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.




रोजगार मेळाव्याची प्रमुख केंद्रे:

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आणि प्रमुख शैक्षणिक तसेच औद्योगिक संस्थांमध्ये हे मेळावे आयोजित केले आहेत:

  • जळगाव शहर व परिसर: गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय (अतिरिक्त एमआयडीसी, भुसावळ रोड), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, लिग्रँड इंडिया प्रा. लि. (अजिंठा रोड), सुप्रिम इंडस्ट्रीज (एमआयडीसी), निमजाई फाऊंडेशन स्किल सेंटर (जुना नशिराबाद रोड), केमीस्ट भवन (गणेश नगर, नवीन जोशी कॉलनी), केसीई इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.
  • धरणगाव तालुका: एस.एस.बी.टी. महाविद्यालय (बांभोरी).
  • सावदा: नगर परिषद हॉल.
  • अमळनेर: प्रताप महाविद्यालय (रेल्वे स्टेशनजवळ).
  • भडगाव: सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय.
  • भुसावळ: राही फाऊंडेशन, नहाटा महाविद्यालय परिसर (जामनेर चौफुली).
  • बोदवड: श्री ओंकारलालजी रामकुंवरजी अग्रवाल सभागृह (अग्रसेन भवन).
  • चाळीसगाव: शिवनेरी फाऊंडेशन.
  • चोपडा: तहसील कार्यालय सभागृह.
  • एरंडोल: दादासाहेब दिगंबर शंकर पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय.
  • मुक्ताईनगर: कृषी महाविद्यालय.
  • पाचोरा: एस.एस.एम.एम. महाविद्यालय (भडगाव रोड).
  • पारोळा: राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय.
  • रावेर: श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (बऱ्हाणपूर रोड).
  • यावल: जेडीएमव्हीपी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (फैजपूर रोड).
  • जामनेर: जामनेर रेवा गुजर मंडळ संचलित श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय.



नोंदणी व अधिक माहिती:

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी खालील संकेतस्थळावर किंवा दिलेल्या गुगल फॉर्म लिंकद्वारे नावनोंदणी करावी:


  • अधिकृत संकेतस्थळ: www.mahaswayam.gov.in
  • संपर्क कार्यालय: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय आवार, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव - ४२५००१.
  • दूरध्वनी: ०२५७-२९५९७९०

Maharashtra Pulse News 📰 
मुख्य संपादक श्री. नवल परदेशी 





Post a Comment

0 Comments