विटनेर (प्रतिनिधी):
येथील दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी (ता. जामनेर) संचलित डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालयात १६ सप्टेंबर रोजी पालक सभा व महिला आरोग्य शिबिराचे संयुक्त आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.ज्योतीताई भालेराव या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. बाविस्कर यांनी केले. या शिबिरात गोल्ड मेडलिस्ट स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ. जागृती पाटील यांनी उपस्थित महिलांची सखोल आरोग्य तपासणी करून आवश्यक तो औषधोपचार केला.
तसेच बदलत्या जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी अत्यंत मोलाचे व सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर महिलांसह डॉ. जागृती पाटील व त्यांच्या सोबत सहकारी स्टाफ श्री नवल परदेशी व इतर सर्व नर्सेस स्टाफ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. पी. एस. बाविस्कर, उपशिक्षक श्री. एस. आर. देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील महिला भगिनी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक श्री. एस. आर. देशमुख यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी विदयालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Maharashtra pulse News 🫀
संपादक श्री नवल परदेशी




Post a Comment
0 Comments