Type Here to Get Search Results !

शिक्षक सन्मान सोहळ्यात पळासखेडे मिराचे येथील मुख्याध्यापक श्री जयप्रकाश पाटील सर यांचा सन्मान

शिक्षक सन्मान स्वीकारताना श्री जयप्रकाश पाटील सर 

जळगाव : 

बन्सल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश रामराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.


जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित या कार्यक्रमात आदरणीय खासदार स्मिताताई वाघ तसेच भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, दिल्ली येथील अधिकारी आदरणीय सौरभजी चितलांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयप्रकाश पाटील यांना सन्मानित करण्यात आले.


शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच विद्यालयाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.


याप्रसंगी बन्सल क्लासेसचे संचालक आदरणीय हेमंत दिलीप आगीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांच्या या सन्मानाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


 या सन्मानामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.


Maharashtra pulse News 📰 🗞️ 

संपादक श्री. नवल परदेशी 

Post a Comment

0 Comments