Type Here to Get Search Results !

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गोकुळाष्टमी निमित्त 'भक्ती संगीत आराधना' संपन्न


 

पळासखेळे मी.: 


धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गोकुळाष्टमीचे औचित्य साधून 'भक्ती संगीत आराधना' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते


 या कार्यक्रमात भागवताचार्य कु. खुशी पांडे यांनी आपल्या सुरेल भक्ती संगीतातून विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले.



आपल्या सुश्राव्य सादरीकरणातून प्रबोधन करताना कु. खुशी पांडे म्हणाल्या की,

 "माणूस केवळ ज्ञानाने नाही, तर विनयशीलता आणि अनुशासनाने मोठा होतो. 'झरा मूळचाची खरा' या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपली खरी आवड ओळखून करिअर निवडल्यास यशाची उत्तुंग शिखरे सहज पादाक्रांत करता येतात." 

आर्जव, मार्दव आणि माधुर्य यांचा संगम असलेल्या खुशी यांच्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी व शिक्षक मंत्रमुग्ध झाले.



कार्यक्रमाला सुप्रसिद्ध 'करीम बँड'चे संचालक साहेब मास्टर यांचे चिरंजीव श्री. दानिश मास्टर, वाद्यकलाकार श्री. शरद साबळे, श्री. साहिल शेख व श्री. आढाळके यांनी उत्तम वाद्यवृंद साथ देत कार्यक्रमात अधिक रंग भरला.

 तसेच श्री. कृष्णा वारंगे यांनी अत्याधुनिक व कर्णमधुर साऊंड सिस्टीमची व्यवस्था उपलब्ध करून दिली.


हा भक्ती संगीताचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवर कलाकारांचे आभार व्यक्त करण्यात आले. 



कार्यक्रमास विद्यालयातील मुख्याध्यापक श्री जे आर पाटील सर, व पर्यवेक्षक  आर पी पाटील सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



महाराष्ट्र पल्स न्यूज 

संपादक श्री नवल परदेशी


Post a Comment

0 Comments