![]() |
म्हसावद (जळगाव):
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रुळांच्या दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात येत असल्याने म्हसावद (ता. जि. जळगाव) येथील रेल्वे फाटक क्रमांक १४४ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी चार दिवस बंद राहणार आहे.
याबाबत वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर (रेलपथ), पाचोरा कार्यालयामार्फत अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.
* बंद कालावधी: मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ (सकाळी ०६:०० वाजेपासून) ते शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत)
* कार्यान्वित कारण: रेल्वे रुळांच्या तातडीच्या दुरुस्ती व देखभाल दुरुस्तीचे काम.
नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन !
सदर रेल्वे फाटक बंद राहणार असल्याने म्हसावदसह पाथरी, बोरनार, कुऱ्हाडदे, वावडदा, बिलवाडी, नागदोली परिसरातील ग्रामस्थ, प्रवासी आणि वाहनधारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. तसेच एरंडोल बस आगार, रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजनात सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



Post a Comment
0 Comments