पळसखेडे मी.(प्रतिनिधी): येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
शासनाच्या नवीन Standard Operating Procedure (SOP) नियमावलीनुसार कार्यक्रमाची सुरुवात 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनाने झाली. मुख्य ध्वजारोहण विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त सैनिक तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) चे वरिष्ठ सहाय्यक श्री. धनराज रामदास न्हावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
कार्यक्रमात स्काऊट-गाईड ध्वजारोहण इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु. दिव्या निलेश राजपूत हिच्या हस्ते झाले, तर कु. जागृती सुनिल राजपूत हिने संचलनाचे नेतृत्व केले.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लयबद्ध संगीतमय कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथही देण्यात आली. त्यानंतर भारतमातेचा जयघोष करत विद्यार्थी व शिक्षकांनी गावात भव्य प्रभातफेरी काढली. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, दुर्गा दूध उत्पादक सहकारी सोसायटी, जि. प. उर्दू शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व जि. प. मराठी शाळा या ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करत ध्वजारोहण सोहळा पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे ज्येष्ठ संचालक बापूसाहेब श्री. रघुनाथराव निळकंठ पाटील, गावच्या सरपंच सौ. आशाताई संजय पवार, सल्लागार समितीचे सदस्य बाबासाहेब श्री. जनार्दन पवार, श्री. अब्दुल नबी तांबोळी, श्री. डी. पी. पाटील सर, डॉ. सौ. लताताई दिवाकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब श्री. चंद्रशेखर काळे, श्री. हिरालाल रामलाल राजपूत, श्री. चंद्रकांत कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक श्री. व्ही. आर. पाटील सर, उपसरपंच श्री. संदीप काळे, माजी उपसरपंच श्री. अनिल भागचंद राजपूत, श्री. समाधान सुरेश पाटील, श्री. प्रभाकर यशवंत पाटील, उपसरपंच श्री. जगनसिंग नारायण राजपूत, श्री. जगनबाबा गायके, श्री. कैलासभाऊ साबळे, श्री. किशोर सपकाळे, श्री. भरत बापू, श्री. गोविंद उद्दलसिंग राजपूत, श्री. प्रकाश सूर्यवंशी, श्री. ज्ञानेश्वर वराडे (CRPF), मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील, पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील, ज्येष्ठ लिपिक श्री. किरण सोनवणे भाऊसाहेब, ज्येष्ठ शिक्षक श्री. पवार सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील ध्वजारोहण संचलन ज्येष्ठ शिक्षक श्री. दिनेश चौधरी सर यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. तीर्थराज तुकाराम इंगळे सर यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी श्री. व्ही. ए. पाटील सर व श्री. स्वप्नील पाटील सर यांनी सांभाळली.
शेवटी आभारप्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री. जी. पी. पाटील सर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्र पल्स न्युज 📰
संपादक. श्री नवल परदेशी






Post a Comment
0 Comments