विटनेर, जळगाव : ( दिनांक 16 ऑगस्ट 2026)
ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव यांच्या विद्यमाने व बजरंग दल विटनेर यांच्या विशेष सहकार्यातून गावातील 300 पेक्षा जास्त होतकरू विद्यार्थ्यांसाठी "मोफत वहया-इतर शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले व कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
परिसरातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उद्देशाने, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. अशोक भाऊ जैन* यांच्या संयुक्त संकल्पनेतून व बजरंग दल विटनेर यांच्या विशेष सहकार्याने हा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून करण्यात आली. हे प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे श्री श्यामभाऊ कोगटा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.श्यामभाऊ कोगटा यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. " *विद्यार्थ्यांनी जिद्दीने व प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे,"* असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
उपमहापौर मनोज चौधरी, महानगर उपाध्यक्ष पवन ठाकूर, माजी सरपंच सुरेश गोलांडे, नितीन जैन, राजू रामा वराडे, संजय भाऊसिंग परदेशी, अरुण पवार,मनीष मोहनराव घाडगे, बाबू दादा, छन्नू पिंजारी, सोपान भाऊ वराडे, निंबा दादा गोलांडे, उपसरपंच रघुनाथ जाधव, अमृत शेणपुडू धोबी, रमेश शेणफडू वराडे, जगन साबळे, रज्जाक पिंजारी, अनिल गोलांडे, विलास भगत, राजू चुंगडे, डॉ. विनोद परदेशी आणि भीमराव शिदोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संदीप बळीराम ठोंबरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संदीप पुरुषोत्तम ठोंबरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
मुख्य संपादक श्री नवल परदेशी




Post a Comment
0 Comments