Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनी विटनेर गावासाठी सामाजिक कार्याचा वसा: स्वर्गीय रमेश फकिरा परदेशी यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीला पेटी सुपूर्द*

सामाजिक जाणिवेतून अनोखी आदरांजली: स्व. रमेश फकिरा परदेशी यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांसाठी शवपेटी प्रदान.



 विटनेर (जळगाव): दि-15 ऑगस्ट 2026 :  

भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज विटनेर ग्रामपंचायत येथे एका सामाजिक जाणिवेच्या आणि भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील सुपुत्र श्री. राजू परदेशी यांनी आपले दिवंगत आप्तेष्ट, स्वर्गवासी रमेश फकिरा परदेशी यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ विटनेर गावासाठी एक पेटी ( शवपेटी ) सप्रेम भेट म्हणून दिली.


या पेटीचे विधिवत लोकार्पण आज ग्रामपंचायत कार्यालयात समोर श्री.गणेश चुंगडे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.



१५ ऑगस्टच्या ध्वजारोहण समारंभानंतर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विटनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व पदाधिकारी, श्री. हरी धोंडू साठे, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी, गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी आणि सर्व तरुण मंडळी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत ठिकाणी उपस्थित होती.




"परदेशी खोलवाळ" परिवाराने स्वर्गीय रमेश फकिरा परदेशी  यांच्या स्मृती कायमस्वरूपी गावात राहाव्यात आणि गावातील गरजू कुटुंबांना दुःखद प्रसंगी या पेटीचा उपयोग व्हावा, अशी भावना व्यक्त केली. 


त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विटनेर ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले."


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 




Post a Comment

0 Comments