![]() |
वाकोद (ता. जामनेर, जि. जळगाव) :
धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदूर्णी संचलित 'राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद' यांच्या वतीने तसेच 'भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव' यांच्या अनमोल सहकार्याने ‘श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा (वर्ष १० वे - २०२६)’ चे आयोजन करण्यात आले आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या सुविद्य पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वगुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्तगुणांचा विकास व्हावा आणि विचारमंथनातून संवेदनशील, जागरूक व ज्ञानी भावी पिढी घडावी, या उदात्त हेतूने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली जात आहे.
स्पर्धेचे तपशील :
- वार व दिनांक : बुधवार, ९ सप्टेंबर २०२६
- वेळ : सकाळी १०:०० वाजता
- स्थळ : राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद (ता. जामनेर, जि. जळगाव)
- (टीप: वाकोद हे जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून केवळ ६ कि.मी. अंतरावर आहे.)
उद्घाटन व अध्यक्षीय उपस्थिती :
- उद्घाटक : मा. श्री. अशोकभाऊ भवरलालजी जैन (अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव)
- पारितोषिक वितरण कार्यक्रमाध्यक्ष : मा. श्री. संजयरावजी भास्करराव गरुड (अध्यक्ष, धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी)
गटनिहाय विषय व वेळ मर्यादा :
- गट १ (इयत्ता ५ वी ते ७ वी) — वेळ: ३ मिनिटे
- निसर्गाचे पत्र मानवाला
- कुटुंब हीच पहिली शाळा
- चांगला स्पर्श-वाईट स्पर्श : ओळख आणि सावधगिरी
- गट २ (इयत्ता ८ वी ते १० वी) — वेळ: ४ मिनिटे
- जलसंधारण - काळाची गरज
- कौशल्याधारित शिक्षणाची गरज
- जय जय महाराष्ट्र माझा
- गट ३ (इयत्ता ११ वी ते १२ वी) — वेळ: ६ मिनिटे
- पेपरफुटी - गुणवत्ता हरली की व्यवस्था
- नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी निर्माण करणारे बना
- जागतिक महासत्तांचे संघर्ष आणि सामान्यांचे आयुष्य
![]() |
प्रत्येक गटातील आकर्षक पारितोषिके :
- प्रथम क्रमांक : रोख ₹५,००१/- + स्मृती चिन्ह + प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक : रोख ₹३,००१/- + स्मृती चिन्ह + प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक : रोख ₹२,००१/- + स्मृती चिन्ह + प्रमाणपत्र
स्पर्धेचे महत्त्वाचे नियम व वैशिष्ट्ये :
१. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
२. स्पर्धकांची नावे दिनांक ६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे.
३. प्रत्येक गटासाठी एका शाळेतून एक स्पर्धक पाठवता येईल.
४. स्पर्धकाने भाषणाची संगणकीकृत (Type केलेली) प्रत सादर करणे आवश्यक आहे.
५. स्पर्धक व व्यवस्थापकांच्या भोजनाची चोख व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
६. जिल्ह्याबाहेरील स्पर्धकांना आवश्यकतेनुसार निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल (प्रवेशिकेत तसा स्पष्ट उल्लेख असावा).
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रवेशिका खालील क्रमांकांवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवाव्यात:
- श्री. नितीन बी. पाटील (स्पर्धा प्रमुख) — मो. ९५५९१७६५३३ / ७५५९१७६५३३
- श्री. एस. टी. चिंचोले (मुख्याध्यापक) — मो. ८३९०३४५३५३
- श्री. ए. टी. चौधरी (मार्गदर्शक) — मो. ९४२१५२३५२६
- श्री. विनोदसिंह राजपूत (व्यवस्थापक, जैन फार्म, वाकोद)
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, वाकोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
मुख्य संपादक श्री नवल परदेशी




Post a Comment
0 Comments