Type Here to Get Search Results !

पळसोद येथील जिल्हा परिषद शाळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट; शैक्षणिक उपक्रम व डिजिटलायझेशनचे केले कौतुक



जळगाव (प्रतिनिधी): 

तालुक्यातील पळसोद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कार्याचा व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.


या प्रसंगी जिल्हा परिषद जळगावचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी, जिल्हा प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.य.) श्री. आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी (पं.स. जळगाव) श्री. चंद्रकांत बोडरे तसेच बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. शिसोदे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


भेट प्रसंगी मान्यवरांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच शाळेचा परिसर, परसबाग, सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोलर प्रणाली या बाबींची सविस्तर माहिती घेतली. 


शाळेत दोन्ही वर्गांमध्ये स्मार्ट टीव्हीद्वारे सुरू असलेले डिजिटल अध्यापन, आधुनिक पद्धती आणि एकंदरीत उत्कृष्ट व्यवस्थापन पाहून सर्व मान्यवरांनी आवर्जून समाधान व्यक्त करत कौतुक केले.




शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंकज रमेशराव गरुड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमांनी स्वागत केले आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.


या प्रसंगी सरपंच श्री. पंकज पाटील, उपशिक्षक श्री. स्वप्नील कांदळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. देवराम वाघ तसेच इतर शिक्षक, पालक व सुजाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 🗞️

मुख्य संपादक श्री नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments