Type Here to Get Search Results !

विटनेर येथे ‘विचारमंथन वक्तृत्व स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न - युवा वक्ता सुमित दिपक खैरे यांचा प्रेरणादायी उपक्रम


विटनेर, जळगाव 

 दि. १४ ऑगस्ट २०२६ : माध्यमिक शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला व विचारक्षमतेला चालना देण्यासाठी विटनेर येथे ‘विचारमंथन वक्तृत्व स्पर्धा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


या स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चे महत्त्व, देश व गावाच्या विकासातील तरुणांची भूमिका, व्यसनमुक्ती, तरुण भारत यांसह विविध समकालीन व सामाजिक विषयांवर आपले प्रभावी व रोखठोक विचार मांडले.


उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर कुमारी खुशी विष्णू नावडे यांनी  प्रथम क्रमांक, कुमारी ममता प्रकाश साबळे यांनी द्वितीय क्रमांक, तर कुमारी तन्वी फुंड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


स्पर्धेतील सर्व विजेत्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना ‘गौरव व प्राविण्य प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध सामाजिक व समकालीन विषयांवर केलेले विचारमंथन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.


या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन युवा वक्ता सुमित दिपक खैरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक भान, विचार करण्याची क्षमता आणि प्रभावीपणे आपले मत मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र पल्स न्युज 📰 

मुख्य संपादक श्री.नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments