Type Here to Get Search Results !

स्व.पदमाबाई बारकू पाटील विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न २५० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांची तपासणी; गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करणार

 

👁️ निरोगी दृष्टी, उज्ज्वल भविष्य!
आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर विद्यार्थी, शिक्षक व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा एकत्र टिपलेला क्षण.



.

चिंचोली,जळगाव:

सुप्रीम कॉलनी येथील स्व. पदमाबाई बारकू पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थ्यांचे दि. १४ जुलै ते २० जुलै या दरम्यान मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिरासाठी शाळेतील २५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, चिंचोली येथे नेण्यात आले होते. 

तेथे सर्वांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळला आहे, त्यांना संस्थेच्या वतीने लवकरच मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.

 
चिंचोली येथील श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालयात विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करतानाचां क्षण

या शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी उपस्थितांची नेत्रतपासणी केली. तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. किशोर देशमुख, नर्सिंग स्टाफ व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.

हे शिबीर श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दीपक पाटील सर, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.


श्री.चामुंडामाता होमिओपॅथिक महाविद्यालय व श्री.पी. इ. तात्या रुग्णालय जळगाव 


 सर्व शाळांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा: गटशिक्षणाधिकारी अजित तडवी

> जळगाव तालुक्याचे गट-शिक्षणाधिकारी मा. श्री. अजित तडवी यांनी तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी आपली नेत्र व आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे निर्देश सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. तसेच, जास्तीत जास्त शाळांनी या स्तुत्य उपक्रमाचा व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

मुख्य संपादक - श्री. नवल परदेशी 





Post a Comment

0 Comments