Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत उच्च शिक्षण व कोचिंग संधी; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद.

 



जळगाव (प्रतिनिधी):

जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना,
 कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना, 
तसेच जन्मतः अनाथ व एकल पालक असलेल्या इयत्ता १०वी पुढील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

अशा सर्व पाल्यांना उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण तसेच JEE, NEET आणि CET यांसारख्या विविध प्रवेश परीक्षांसाठी मोफत निवासी शिक्षण व कोचिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून, या उपक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी महोदय स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी थेट संवाद साधणार आहेत.

कार्यक्रम तपशील
दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ९:०० वाजता


ठिकाण: जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 'दीपक परदेशी (अध्यक्ष, भरारी फाउंडेशन, जळगाव - मो. ८८३०८५३०६९) यांच्याशी संपर्क साधावा.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 
मुख्य संपादक श्री नवल परदेशी 




Post a Comment

0 Comments