विटनेर (ता. जी .जळगाव)
ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी, आजारांची प्राथमिक लक्षणे वेळेत ओळखून त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत, या उद्देशाने सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (नेरी) यांच्या वतीने विटनेर येथे भव्य विनामूल्य महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, विटनेर येथे पार पडलेल्या या शिबिराला महिला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, परिसरातील तब्बल ३९० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
![]() |
| # गोल्ड मेडलिस्ट डॉ. जागृती पाटील यांचे विशेष मार्गदर्शन |
हे संपूर्ण शिबिर सुयश हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख, प्रख्यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसेच गोल्ड मेडलिस्ट डॉ. सौ. जागृती सतिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
शिबिरादरम्यान महिलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, वैद्यकीय परीक्षण करून त्यांना आवश्यकतेनुसार मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिबिरात आलेल्या गरजू महिलांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात काळजी आणि स्तनपान समुपदेशन याविषयी डॉ. जागृती पाटील यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विटनेर गावातील महिला सरपंच नेहा ललित साठे व गावातील अशा सेविका व ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभले.
शिबिराच्या चोख नियोजनासाठी सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. नवल परदेशी व हॉस्पी.फार्मसिस्ट श्री. राहुल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्तम नियोजनामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले असून, विटनेर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सुयश हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आणि डॉ. जागृती पाटील मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰




Post a Comment
0 Comments