Type Here to Get Search Results !

​शेंदुर्णी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त निळकंठ पं. पाटील विद्यालयात किशोरवयीन मुलींचे आरोग्य व सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न





 पळासखेळे मी.(प्रतिनिधी):

धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी यांच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज दिनांक १४ जुलै २०२६, वार मंगळवार रोजी निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात मुलींसाठी विशेष 'आरोग्य विषयक समुपदेशन शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते.



या शिबिरात नेरी (ता. जामनेर) येथील सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तथा प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ.सौ.जागृती सतीश पाटील यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दोन वेगवेगळ्या सत्रांत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी पौगंडावस्थेतील शारीरिक बदल, मासिक पाळी व त्यादरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच सध्याच्या काळातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करत 'पोक्सो' (POCSO - Prevention of Children from Sexual Offenses) कायद्याबाबत मुलींना सविस्तर कायदेशीर माहिती देऊन जागरूक केले.


      निळकंठ पाटील विद्यालयाच्या वतीने सुयश हॉस्पिटल टीमचा गौरव करतानाचा क्षण! 🙏✨

याप्रसंगी व्यासपीठावर बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पाटील, स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. लताताई दिवाकर पाटील, सुयश हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री.नवल परदेशी, फार्माप्रतिनिधी श्री.अरबाज शाहबाज तसेच विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री.जयप्रकाश रामराव पाटील सर व पर्यवेक्षक श्री.आर.पी.पाटील सर उपस्थित होते.

कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक श्री. एम. एम. पवार सर, श्री. व्ही. ए. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. पी. खरे मॅडम, श्रीमती निलिमा पाटील, श्रीमती प्रियंका पाटील व शिपाई श्री. विनय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. व्ही. डी. पाटील सर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. स्वप्नील पाटील सर यांनी केले.           
                         

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थिनींकडून 'फीडबॅक फॉर्म' (अभिप्राय) भरून घेण्यात आले.

याप्रसंगी सुयश हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पाटील व डॉ. सौ.जागृती पाटील मॅम यांनी विद्यालयाला  "भविष्यातही शाळेतील मुला-मुलींच्या आरोग्यासाठी, विविध व्याख्यानांसाठी आणि आरोग्य तपासणी शिबिरांसाठी सुयश हॉस्पिटलची टीम नेहमीच सहकार्य करण्यास तयार राहनार असल्याचे सांगितले.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 








Post a Comment

0 Comments