Type Here to Get Search Results !

कृषी क्षेत्रातील अद्भूत चमत्कार! केळीच्या एकाच झाडाला तब्बल २०० हून अधिक कंबळे



भडगाव (वाडे):

निसर्गाचे अनेक चमत्कार आपल्याला वेळोवेळी थक्क करत असतात. असाच एक थक्क करणारा आणि अत्यंत दुर्मिळ प्रकार जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे समोर आला आहे. येथील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतातील केळीच्या झाडाला तब्बल २०० पेक्षा जास्त कंबळे (मोचा) आल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी क्षेत्रात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


नेमका प्रकार काय?

वाडे येथील प्रगतशील शेतकरी श्री.शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. योग्य व्यवस्थापन आणि मेहनतीमुळे त्यांची केळीची बाग जोमात आली असून सर्व झाडांना नियमितपणे घड लागले आहेत. मात्र, या बागेतील एका विशिष्ट झाडाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या झाडाला नेहमीप्रमाणे एक-दोन नव्हे, तर तब्बल २०० हून अधिक कंबळे फुटली आहेत.





परिसरात कौतुक आणि पाहण्यासाठी गर्दी

केळीच्या झाडावर एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कंबळे फुलण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. या अनोख्या झाडाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच, परिसरातील शेतकरी, कृषीप्रेमी आणि नागरिक हे आश्चर्यकारक दृश्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी गोठवाळ यांच्या शेतात गर्दी करत आहेत. वनस्पतींमधील जैविक बदल आणि विविधतेचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

 मी माझ्या एक एकर शेतात केळीची लागवड केली आहे. बागेतील इतर सर्व झाडांना नेहमीप्रमाणेच घड आले आहेत, पण या एकाच झाडावर २०० हून अधिक कंबळे आल्याचे पाहून मला स्वतःलाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला." असे शेतकरी शांताराम गोठवाळ (केळी उत्पादक शेतकरी, वाडे, ता. भडगाव) यांनी सांगितले.


महाराष्ट्र पल्स न्यूज 📰 

संपादक श्री. नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments