![]() |
| उद्घाटन सोहळा 24 मे 2026 रोजी नामदार गिरीश भाऊ यांच्या हस्ते |
जळगाव/नेरी (प्रतिनिधी): नेरी बु॥ (ता. जामनेर) येथील जुना टोल नाका, जळगाव - छ. संभाजीनगर हायवे परिसरात अत्याधुनिक आरोग्य सेवांनी सुसज्ज अशा 'सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, प्रसूतीगृह आणि बालरुग्णालयाचा' भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाला मा. सौ. साधनाताई गिरीष महाजन (मा. नगराध्यक्ष, नगर परिषद जामनेर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. डॉ. उल्हासदादा पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाऊंडेशन, जळगाव),
मा. डॉ. प्रशांत भोंडे (उपनगराध्यक्ष, जामनेर),
मा. श्री. दिलीप खोडपे सर (मा. जि.प. अध्यक्ष, जळगाव),
मा. श्री. तुकारामआप्पा निकम (सरपंच, देवपिंप्री),
मा. श्री. जे. के. चव्हाण साहेब (उपअभियंता, जि. प. जळगाव),
मा. श्री. नानासो प्रमोद अमृतराव पाटील (चेअरमन, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ),
मा. ॲड. श्री. बापुसो भरत बी देशमुख (माजी चेअरमन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा) हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच मा. श्री. चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा. जळगाव), मा. श्री. शेखर काळे, मा. श्री. अण्णादादा पिठोडे, मा. श्री. अमर पाटील, मा. श्री. कमलाकर पाटील (पाळधी) आणि मा. श्री. शरद पाटील सर (मा. उपनगराध्यक्ष, जामनेर) यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मांदियाळी:
रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मा. डॉ. अमोल अन्नदाते (फाउंडर डायरेक्टर, आनंद ग्रुप, वैजापूर),
मा. डॉ. मिलिंद निकुंभ (प्रो. व्हाईस चान्सलर, MUHS, नाशिक),
मा. डॉ. प्रियांका नाकडे (सेक्रेटरी, निमा सेंट्रल),
मा. डॉ. कौस्तुभ साळुंखे (प्रिसिडेंट, निमा सेंट्रल),
मा. डॉ. स्वप्निल सांगळे (सिव्हिल सर्जन, जळगाव),
मा. डॉ. सचिन भायेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव)
यांच्यासह स्थानिक प्रशासनातील मा. श्री. नानासाहेब आगळे (तहसिलदार, जामनेर),
मा. श्री. मुरलीधर कासार साहेब (पोलीस निरीक्षक, जामनेर),
डॉ. हर्षल चांदा, डॉ. राजेश सोनवणे व डॉ. कोमल देसले आदी मान्यवर उपस्थित राहून डॉक्टरांना शुभेच्छा देतील.
![]() |
| स्पर्श सेवा आणि विश्वासाचा |
ग्रामीण भागासाठी वरदान:
स्पर्श सेवा आणि विश्वासाचा' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू होत असलेल्या या रुग्णालयामध्ये नवजात शिशूंपासून ते प्रसूती व स्त्रीरोगांपर्यंतच्या सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा (NICU, PICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, वंध्यत्व निवारण केंद्र, सोनोोग्राफी, एक्स-रे) एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाचे संचालक डॉ. सतिष सुरेश पाटील MD (नवजात शिशु व बालरोग तज्ञ) आणि डॉ. सौ. जागृती सतिष पाटील MS (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ) हे या भागात आपली तज्ञ सेवा देणार आहेत.
तरी या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील समस्त नागरिक, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय व्यावसायिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रुग्णालय पत्ता: जुना टोल नाका, जळगाव - छ. संभाजीनगर हायवे, नेरी बु॥ ता. जामनेर.
संपर्क: ०२५८०-२२०२२०, ८७९३९३९३९६
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
संपादक श्री नवल परदेशी


Post a Comment
0 Comments