![]() |
| जळगाव एस.टी. बस स्थानकावर उष्माघात प्रतिबंधक आरोग्य उपक्रम संपन्न |
दि. 13/05/2026, बुधवार रोजी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालय तसेच रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव एस.टी. बस स्थानक येथे उपस्थित प्रवाशांना उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान जळगाव बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री. संदीप पाटील साहेब, स्थानक प्रमुख श्री. राजेश पांडे, श्री. खेमराज पाटील, श्री. बाबू तडवी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्षा सौ. मंगलाबाई ठोंबरे यांनीही उपस्थित राहून उपक्रमास सहकार्य केले.
श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. प्रदीप चौधरी तसेच प्रशिक्षणार्थी नविराह शेख, विशंभर ढगे, वैष्णवी पाटील, प्रज्वल देशमुख, बिभीषण पोळे, वैष्णवी वडनेरकर, नबील खान व युक्ता सुरवाडे यांनी प्रवाशांना उष्माघातावरील मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप केले. यावेळी औषधे कशा प्रकारे घ्यावीत तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग तसेच रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
संपादक श्री. नवल परदेशी


Post a Comment
0 Comments