![]() |
| "महाराणा प्रताप आणि शिवरायांच्या मूर्तींचे एकत्र पूजन!" |
विटनेर (जळगाव): येथील ग्रामस्थांच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराणा प्रताप यांच्या मूर्तीसोबतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचेही पूजन करून 'शिव-प्रताप' या दोन महान विचारधारांचा संगम साधण्यात आला.
"ज्यांच्या तलवारीच्या धारेने इतिहास घडला,
ज्यांच्या स्वाभिमानापुढे दिल्लीचा तख्तही झुकला...
अशा मेवाडपती महाराणा प्रताप आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विटनेर नगरीत मानाचा मुजरा
!"
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही थोर पुरुषांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून आणि विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित तरुण मंडळी व ग्रामस्थांनी दिलेल्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता.
याप्रसंगी गावातील प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला चतरसिंग परदेशी, नाना परदेशी, छोटू पाटील, चिराग शेठ, श्यामसिंग परदेशी, डॉ. विनोद परदेशी, आकाश परदेशी, राजू परदेशी, बापूदादा परदेशी, नवल परदेशी, शुभम परदेशी, सुनील अप्पा, आकाश चुंगडे, ललित बागुल, छोटू परदेशी, गणा परदेशी, सचिनदादा पाटील, गौरव पाटील, गौरव राजपूत, खुशाल परदेशी, गब्बर, भारत दिवाने, रघुनाथ जाधव, चेतन पाटील, बबलूभाऊ परदेशी, ललित पाटील, बजरंग परदेशी, गनेश चुंगडे, दगडू मामा, सागर दिवाणे, रविन वाघ, पका परदेशी, मनीष घाटगे, पंडत,गणा पाटील, आनंद परदेशी, विनोद ,जयसिंग टक्या, हर्षल वराडे यांसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
![]() |
| 🍌🥣 यावेळी उपस्थित सर्वांना पोहे व केळी वाटप करण्यात आली |
"महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांचे आयुष्य शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी संघटित व्हावे," असा सूर याप्रसंगी व्यक्त झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश परदेशी, शुभम परदेशी,राजू परदेशी व इतर सर्व महाराणा प्रताप मंडळ सदस्य यांनी मेहनत घेतली.
Maharshtra Pulse News 🗞️
Shri.Naval Pardeshi





Post a Comment
0 Comments