कासमपुरा (ता. पाचोरा): येथे श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री तपेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, लोहारा व वैष्णवी क्लिनिक, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत बालविकास आरोग्य तपासणी शिबिर चौकातील हनुमान मंदिरात उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये २ ते ८ वर्ष वयोगटातील बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. अमोल घोलप (बालरोग तज्ञ, सिद्धिविनायक हॉस्पिटल, शेंदुर्णी) तसेच डॉ. विकास पालीवाल ,( वैष्णवी क्लिनिक, लोहारा) यांनी मुलांची सखोल आरोग्य तपासणी करून पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले
लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शनही पालकांना देण्यात आले.
शिबिराला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लाभली. यामध्ये
श्री. योगराज कांतीलाल राजपूत ( अध्यक्ष श्रीरामसिता शि. प्र. मंडळ कासमपुरा)
सौ. शितलताई विक्रमसिंग राजपूत ( उपाध्यक्ष व उपअभियंता, गंगापूर विभाग),
श्री. किरण चौधरी ( मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय कासमपुरा)
तसेच सौ. पालीवाल मॅडम ( मुख्याध्यापक, इंग्लिश मिडीयम स्कूल लोहारा )
यांचा समावेश होता.
तसेच संस्थेतील सर्व शिक्षक,कर्मचारीवर्ग व कासमपुरा ग्रामस्थांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
👉 ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारे हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
श्री नवल परदेशी


Post a Comment
0 Comments