Type Here to Get Search Results !

विद्यार्थी-पालकांच्या आवाजाला व्यासपीठ : संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सूचना पेटी’ उपक्रम सुरू







जळगाव (प्रतिनिधी):📰 विद्यार्थी-पालकांच्या आवाजाला व्यासपीठ : संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सूचना पेटी’ उपक्रम सुरू

रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे व पालकांचे मत जाणून घेण्यासाठी ‘सूचना पेटी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीसाठी उपयुक्त सूचना, तक्रारी तसेच विविध कल्पना संकलित केल्या जाणार आहेत.


विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता आपले विचार मांडता यावेत तसेच पालकांनाही शाळेच्या कार्यपद्धतीबाबत आपले मत मांडण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सूचना पेटीत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची योग्य अंमलबजावणी केली जाईल, असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.


या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी व पालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र पल्स न्यूज 

श्री नवल परदेशी 

Post a Comment

0 Comments