भडगाव -(प्रतिनिधी ) - बाळद नगरीचे सुपुत्र व युवा नेतृत्व शितल दादा सोमवंशी यांनी आपल्या स्वखर्चातून गावातील जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनाची विशेष सहल आयोजित केली.
या सहलीत गावातील अनेक जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून, त्यांच्या सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या तीर्थदर्शनादरम्यान जेष्ठ नागरिक विविध पवित्र स्थळांचे दर्शन घेणार असून धार्मिक वातावरणाचा आनंद लुटणार आहेत. या उपक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसून आला.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
👉 जेष्ठ नागरिकांच्या आनंद व समाधानासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
महाराष्ट्र पल्स न्यूज संपादक -
श्री नवल परदेशी


Post a Comment
0 Comments