जळगाव (प्रतिनिधी) : दि.05/04 /2016 रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवारी महाबळ येथील लोकहित दवाखान्यात पार पडलेल्या या शिबिरात एकूण १४० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिरात हृदयविकार, फुफ्फुस रोग, बालरोग, युरोलॉजी आणि जनरल सर्जरी या विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांची बी.पी., शुगर आणि ईसीजी तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष एस. एस. राणे व सचिव डी. एन. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चेतन निकम, श्री. धनजी राणे तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाबद्दल शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
Maharshtra pulse News,
Naval Pardeshi


Post a Comment
0 Comments