Type Here to Get Search Results !

* 📰 जळगावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): 

विद्यार्थी सहायक समिती, जळगाव यांच्या रौप्य वर्षपूर्ती निमित्त तसेच वनीता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, दिनांक  05 एप्रिल 2026* रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित करण्यात आले असून, 

ठिकाण लोकहित दवाखाना, संत गाडगेबाबा चौक, रायसोनी नगर रोड, जळगाव येथे आहे.


या शिबिरात  जनरल सर्जरी , फुफ्फुसरोग , बालरोग , हृदय रोग तसेच युरोलॉजी या विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची बी.पी ., शुगर व ईसीजी तपासणी मोफत करण्यात येणार असून काही *औषधेही मोफत दिली जाणार आहेत.

आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच तपासणीसाठी येताना जुने वैद्यकीय अहवाल व रिपोर्ट सोबत आणावेत.

अधिक माहितीसाठी डॉ. चेतन निकम व श्री. धनंजय राणे यांच्याशी संपर्क साधावा.


मुख्य संपादक नवल परदेशी, जळगाव




Post a Comment

0 Comments