विटनेर (प्रतिनिधी):
आपल्या विटनेर गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सप्ताहाच्या सांगतेसाठी आयोजित कीर्तन कार्यक्रमात ह.भ.प. सूर्यभान महाराज यांनी कीर्तन केले. यावेळी गावातील लोकनियुक्त सरपंच यांचे चिरंजीव चिराग शेठ यांच्या हस्ते महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन स्व. ललित दादा साठे व स्व. दत्तात्रय दादा रतन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले.
संपूर्ण गावासाठी पंगतीचे आयोजन करून अन्नदान करण्यात आले.
तसेच येथून पुढे तीन वर्षे हा महाप्रसादाचा कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.
समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले. तसेच गावचे वैभव ह.भ.प.संदीप महाराज यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या हस्ते समाजसेवा व सामाजिक कार्य सतत घडत राहावे, अशी प्रार्थना प्रभू श्रीराम चरणी करण्यात आली.
*या पवित्र सोहळ्यात कीर्तन, अन्नदान, साऊंड सिस्टीम, टेंट हाऊस व चहा-पाण्याची सेवा देणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे विशेष आभार मानण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र व विठोबा माऊली यांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहोत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.


Post a Comment
0 Comments