Type Here to Get Search Results !

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व होमिओपॅथी महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव, दि. ११ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) – महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालय येथे ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात वाघ नगर, जिजाऊ नगर, कोल्हे हिल्स तसेच हरिविठ्ठल नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र व आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

कार्यक्रमाला आमदार मा. राजुमामा भोळे, उपमहापौर मा. मनोज चौधरी, नगरसेवक मा. अनिलभाऊ अडकमोल व मा. भूषण लाडवंजारी यांच्यासह सारा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव, उपाध्यक्षा सौ. सुरेखा भालेराव, डॉ. सागर भालेराव व मा. जयसिंगजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार राजुमामा भोळे यांनी महापुरुषांची जयंती आरोग्य शिबिराच्या माध्यमातून साजरी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले व डॉक्टरांच्या टीमचा सत्कार करून त्यांना महापुरुषांची पुस्तके भेट दिली. तसेच महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवकल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.

श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधेही देण्यात आली.

यावेळी जेष्ठ सल्लागार व मान्यवरांमध्ये श्री. डी. एच. भास्कर, श्री. अरविंद बिऱ्हाडे, श्री. बापू साळुंखे, श्री. विनोद सपकाळे, श्री. प्रीतम शिरतुरे, श्री. चंद्रशेखर ओतारी, श्री. जावळे बाबा, श्री. भागवत पाटील, श्री. शिरीष तायडे, श्री. चेतन अहिरे, श्री. मिलिंद वाल्हे, श्री. जनार्दन पाटील, श्री. पुंडलिक पाटील, श्री. संजय सपकाळे, श्री. राहुल भालेराव, श्री. प्रकाश तायडे तसेच सौ. साधनाताई बाविस्कर, सौ. ज्योती सूरदास, सौ. विशाखा हनुवते, सौ. दीपाली सपकाळे, स्वाती मेढे, अलका तायडे, ज्योती लोखंडे, संगीता सपकाळे, शीतल अहिरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वांद्रे सर यांनी केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग तसेच रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Maharashra Pulse News

संपादक - श्री नवल परदेशी 












Post a Comment

0 Comments