Type Here to Get Search Results !

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न, महाड सत्याग्रहावर नाटिका, रमाईंच्या जीवनावर नृत्य; आंबेडकर जयंती कार्यक्रम ठरला विशेष


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


शेंदुर्णी (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक आदरणीय श्री जी.पी. पाटील सर होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण अध्यक्ष, मुख्याध्यापक श्री विकास रघुनाथराव पाटील तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री विकास रघुनाथराव पाटील यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी संदेशाचे महत्त्व स्पष्ट केले.



महाड चवदार तळे सत्याग्रह नाटिका व माता रमाई यांच्या जीवन आधारित सुंदर नृत्य 


कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर आधारित सुंदर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक आंदोलनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्री जी.पी. पाटील सर यांनी बाबासाहेबांच्या विचारांची व्यापकता, सर्वसमावेशकता आणि आजच्या काळातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तीर्थराज तुकाराम इंगळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री एस.एस. भारंबे सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




बातमी सौजन्य: महाराष्ट्र पल्स न्यूज

श्री नवल परदेशी 



Post a Comment

0 Comments