Type Here to Get Search Results !

♻️ “कचरा नाही, संसाधन आहे!” — संत ज्ञानेश्वर विद्यालयात जुने कागदांपासून नव्या वह्यांची निर्मिती


📍 जळगाव (प्रतिनिधी):

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत “जुने कागद – नवी वही” हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी घरातील व शाळेतील वापरलेले जुने कागद गोळा करून त्यापासून आकर्षक व उपयुक्त वह्या तयार केल्या.




  पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कागदांची छाननी, कापणी व बांधणी करत सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. तयार वह्यांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले, ज्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

🌱 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय रुजली असून पर्यावरण संवर्धनाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

🎤 मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक करत

कचरा नाही, संसाधन आहे” हा संदेश देत अशा उपक्रमांची पुढेही सातत्याने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.


महाराष्ट्र पल्स न्यूज 

श्री. नवल परदेशी 

Post a Comment

0 Comments