चिखली:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व चिखली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री.मनोजभाऊ ज्ञानदेवराव दांडगे आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये भव्य 'आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय (जळगाव) येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहे.
या महाशिबिराचा लाभ चिखली परिसरातील जास्तीत जास्त गरजूंनी घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री मनोजभाऊ दांडगे यांनी केले आहे.
### शिबिराचे वेळापत्रक आणि ठिकाण (स.१०:०० वा. सुरू)
२२ जुलै (बुधवार):- बारी समाज मंगल कार्यालय, मासरूळ (ता. जि. बुलढाणा)
२४ जुलै (शुक्रवार):- ग्रामपंचायत कार्यालय, जामठी (ता. जि. बुलढाणा)
२५ जुलै (शनिवार):- हनुमान मंदिर, जणूना (ता. जि. बुलढाणा)
२७ जुलै (सोमवार):- संत सावता माळी मंगल कार्यालय, वरुड (ता. जि. बुलढाणा)
२८ जुलै (मंगळवार):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, कुंभेफळ (ता. जि. बुलढाणा)
उपलब्ध वैद्यकीय सेवा व तपासण्या:
शिबिरामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. तसेच शासकीय योजनेत न बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जातील.
*हृदयरोग विभाग: २D-Echo, ECG, कार्डिओग्राफ, मधुमेह व रक्तदाब तपासणी. मोफत एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, पेस मेकर, आणि ह्रदयाला असलेले छिद्र बिना ऑपरेशनने बंद करणे.
*शस्त्रक्रिया (General Surgery):** मुतखडा, पित्ताशयाचे खडे, प्रोस्टेट, हार्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, मूळव्याध, भगंदर व विविध प्रकारच्या गाठी यांवर उपचार.
**स्त्रीरोग विभाग: गर्भाशयाच्या गाठी, ट्युमर, कॅन्सर तपासणी व अंडाशयाच्या गाठींचे उपचार.
*अस्थिरोग विभाग: सांधेदुखी, फ्रॅक्चर, कंबरदुखी, संधीवात, हाडे ठिसूळ होणे व इतर मान्सपेशींच्या वेदना.
*इतर विभाग: नेत्रालय (मोतिबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया), कान-नाक-घसा विभाग (कानाचा पडदा, टॉन्सिल), जनरल मेडिसिन (लिव्हर, पित्ताशय व पोटाचे आजार) आणि कर्करोग विभाग.
##रुग्णांसाठी आवश्यक कागदपत्रे:
या शिबिराचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी येताना खालील मूळ (Original) कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे:
१. ओरिजिनल रेशन कार्ड (पिवळे किंवा केषरी)
२. रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
३. आयुष्मान कार्ड (असल्यास)
##नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
शिबिरात नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
श्री. विनोद तायडे: ७०५७३८५३४३
श्री.निलेश हिवाळे:७०६६४१२७४५
📍 चिखली तालुक्यातील आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या!
📌 टीप: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येताना आपले ओरिजिनल रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
#आरोग्यशिबीर #मनोजभाऊदांडगे #गोदावरीफाउंडेशन #चिखली #बुलढाणा #जनसेवा #राष्ट्रवादीकाँग्रेस #आरोग्यमधनसंपदा
महाराष्ट्र पल्स न्यूज
संपादक श्री.नवल परदेशी



Post a Comment
0 Comments