![]() |
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक साहित्य उपक्रम |
जळगाव (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2026–27 च्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य (TLM – Teaching Learning Material) तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सोपे, रंजक आणि परिणामकारक व्हावे तसेच त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी विविध विषयांशी संबंधित आकर्षक चार्ट, मॉडेल्स तसेच कृतीआधारित साहित्य तयार केले. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना सहज समजण्यास मदत होत असून त्यांच्या शिकण्यातील आवड आणि सहभाग वाढत आहे.
विद्यालय प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा नाविन्यसंत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांचा शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रम उत्साहातपूर्ण आणि उपयुक्त उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पल्स न्यूज 📰
श्री. नवल परदेशी

Post a Comment
0 Comments